आयपीएल स्थगित! ‘हे’ खेळाडू अडचणीत!

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /नवी दिल्ली:

खेळाडूंना कोरोनाची लागण झाली व आयपीएल स्थगित करण्याचा मोठा निर्णय आज घेण्यात आला. आयपीएलमधील परदेशी खेळाडूंची या निर्णयानंतर मोठी अडचण झाली आहे.  आयपीएलमधील काही परदेशी खेळाडूंना त्यांच्या देशांनी प्रवेश नाकारला आहे. तर काही देशांनी याबाबत अजून कोणतीही भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे या खेळाडूंनी आता नेमके करायचे काय, असा प्रश्न आहे.ऑस्ट्रेलिया सरकारने भारतातील विमानांना आणि प्रवाशांना बंदी घातली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना १५ मेपर्यंत तेथे जाता येणार नाही असे चित्र आहे.ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी मालदिव या देशाचा आसरा घेतला आहे.इंग्लंडने अजूनही या खेळाडूंबाबत कोणताच निर्णय घेतलेला दिसत नाही. त्यामुळे इंग्लंडच्या खेळाडूंचाही प्रश्न आहे.अन्य देशांमध्ये आयपीएलमधील खेळाडू जाऊ शकतात आणि त्याबाबतची चर्चाही आता सुरु झाली आहे.पण ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे खेळाडू नक्की कधी आपल्या देशात जाऊ शकतील, याबाबतची अनिश्चितता आहे.
आयपीएल स्थगित केल्यामुळे अडचण झालेले संघातील खेळाडू
चेन्नई सुपर किंग्स – मोइन अली, सॅम करन, जेसन बर्डनडॉफ.दिल्ली कॅपिटल्स – स्टीव्हन स्मिथ, मार्कस स्टॉइनिस, ख्रिस वोक्स, टॉम करन, सॅम बिलिंग्स.
कोलकाता नाइट राडयर्स – इऑन मॉर्गन, पॅट कमिन्स आणि बेन कटिंग्स.
मुंबई इंडियन्स – ख्रिस लीन आणि नॅथन कल्टर नाइल.
पंजाब किंग्स – डेव्हिड मलान, ख्रिस जॉर्डन, झाय रिचर्डसन, रिली मेरेडिथ, मोइसेस हेनरिक्स.
राजस्थान रॉयल्स – जोस बटलर, अँड्र्यू टाय, लायम लिव्हिंगस्टोन.
आरसीबी – ग्लेन मॅक्सवेल, डॅन ख्रिस्तियन, डॅनियल सॅम्स.
सनरायझर्स हैदराबाद – डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो आणि जेसन रॉय.