माळशिरसमध्ये पहिल्या उद्यानाचे काम चालू! 5 लाख रूपये मंजूर: नगरसेवक मारूती देशमुख

संजय हुलगे

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस: 

महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा या उपक्रमांतर्गत माळशिरस नगरपंचायतच्या वतीने 5 लाख रूपयांची तरतुद करण्यात आली असुन नगरपंचायतच्या  सर्व साधारणसभेत सर्वानुमते ठराव मंजुर झाला आहे. त्यानुसार प्रभाग क्रमांक 11 मधील शाह धारशी काॅलनी येथील खुल्या जागेत बागेचं काम चालु झालं असुन माळशिरसकरांसाठी श्री शांतीनाथ उद्यान म्हणून लवकरच पुर्णत्वास येणार असल्याची माहीती नगरसेवक मारूती देशमुख यांनी दिली.माळशिरस शहराची लोकसंख्या तीस हजाराच्या आसपास असुन नगरपंचायत अस्तित्वात आल्या पासुन नागरिकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत..शहरात एखादी बाग असावी अशी शहरवासियांची अपेक्षा होती.ती या बागेच्या रूपाने ती पुर्ण होणार आहे. शाह धारशी काॅलनी मधील नागरिकांची मागणी लक्षात घेता मी सतत पाठपुरावा करत होतो..महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा या उपक्रमाने या बागेचं स्वप्न पूर्णत्वास येत असुन या प्रस्तावास नगरपंचायतच्या सर्वसाधारण सभेने सर्वानुमते मंजुरी दिली. याबद्दल मी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी व सर्व नगसेवकांचा आभारी आहे. माळशिरस मधील पहीली बाग ‘श्री शांतीनाथ उद्यान’ माझ्या प्रभागात होत असल्याचा आनंद आहे.- नगरसेवक मारूती देशमुख.