निमगाव जि.प.गटासाठी १० कोटी,६४ लाख रूपयांचा निधी मंजूर सदस्या ज्योतीताई पाटील यांची माहिती

 संजय हुलगे

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:

निमगाव जिल्हा परिषद गटातील विविध विकासकामांसाठी सोलापूर जिल्हा परिषदेकडून भाजप जिल्हा सहप्रभारी के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली १ कोटी,१४ लाख,८० हजार रूपये निधी खेचून आणला आहे.तसेच खासदार रणजितसिंह निंबाळकर व आ.राम सातपुते यांच्या प्रयत्नातून वेळापूर-निमगाव-गारवाड-इस्लामपूर- लोणंद-नातेपुते या रस्तासाठी ९ कोटी,५० लाख मंजूर झाला असुन एकुण १० कोटी,६४ लाख,८० हजार रुपये एवढा निधी मंजूर झाल्याची माहिती निमगाव गटाच्या जिल्हा परिषद सदस्या ज्योतीताई पाटील यांनी दिली.       यामध्ये 15 वा वित्त आयोग या योजनेतून निमगाव येथील बोडरे वस्ती,अकलूज रस्ता पाण्याची टाकी बांधणेसाठी 1 लाख 70 हजार,गोरडवाडी येथील कोकरे वस्ती,इस्लामपूर रस्ता पाण्याची टाकी बांधणे 1 लाख 80 हजार रूपये,झिंजेवस्ती,माणकी,पठाणवस्ती,जळभावी,रेडे येथे आर.ओ.प्लांट बसवण्यासाठी मंजूर रक्कम 8 लाख 50 हजार रूपये, निमगाव पिलीव रस्ता ते 65 फाटा कॅनॉल पट्टी 0/00 ते 1/00 किलोमीटर खडीकरण करणे मंजूर रक्कम 5 लाख रूपये,माळशिरस पिलीव रस्ता ते आंबेकर वस्ती रस्ता 0/00 ते 1/00 खडीकरण करणे 5 लाख रूपये,जनसुविधा योजनेतून गोरडवाडी स्मशानभूमी,जळभावी स्मशानभूमी,पठाणवस्ती दफनभूमी, गारवाड स्मशानभूमी,झिंजेवस्ती दफनभूमी,रेडे दफनभूमी,भांब स्मशानभूमी येथे हातपंप बसवणे,माणकी आर.ओ.ग्रा.पं.कार्यालय मंजूर रक्कम 7 लाख 30 हजार रूपये,अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या रस्त्याची दुरुस्ती यामधून चांदापुरी-कुसमोड-मळोली रस्ता दुरुस्ती 6/00 ते 9/00 कि.मी मध्ये सुधारणा करणे मंजूर रक्कम 13 लाख रूपये,गारवाड-दंडाचीवाडी ते सुळेवाडी रस्त्यावर पूल बांधणे व रस्ता सुधारणा करणे मंजूर रक्कम 10 लाख रुपये,50/54 योजनेतून चांदापुरी-कुसमोड-मळोली रस्ता सा.क्र. 3/00 ते 6/00 किलोमीटर सुधारणा करणे मंजूर रक्कम 20 लाख रूपये,खुडुस-बोरकरवस्ती-कारंडे वस्ती- निमगाव रस्ता सा.क्र. 5/00 ते 8/00 किलोमीटर पर्यंत रस्ता करणे मंजूर रक्कम 10 लाख रूपये,माणकी ते गारवाड 0/00 ते 1/00 किमी रस्ता सुधारणा करणे मंजूर रक्कम 9 लाख 50 हजार,प्र.जि.मा.83 ते आंबेकर वस्ती पठाणवस्ती 0/00 ते 0/500 सुधारणा करणे 10 लाख रूपये निमगाव ते काळा मळा खडीकरण करणे मंजूर रक्कम 5 लाख रूपये,तीर्थक्षेत्र विकास आराखडा योजनेतून कण्हेर येथील सिद्धनाथ मंदिर आवार व चौक याठिकाणी 2 हाय मास्ट दिवे बसविणे मंजूर रक्कम 3 लाख रूपये,संभाजीबाबा मंदिर,इस्लामपूर येथे उंच पाणी टाकी मंजूर रक्कम 5 लाख रूपये,नागरी सुविधा योजनेतून निमगाव यादव वस्ती,मळशी येथे स्ट्रेटलाईट बसविणे मंजूर रक्कम 2 लाख 50 हजार रूपये,माणकी 1,गोरडवाडी 2,कुसमोड 1 येथे सौर दिवे बसविणे,निमगाव हनुमानवाडी मारूती मंदीर समोर केशवनगर स्ट्रीट लाईट बसविणे 2 लाख 50 हजार रूपये तसेच व्यक्तिगत लाभातून चाॅपकटर,शिलाई मशीन पिठाची चक्की आदी लाभ दिले आहेत.असे एकुण सुमारे 10 कोटी 62 लाख 30 हजार रूपये एवढा निधी मंजूर झाल्याची माहिती ज्योतीताई पाटील यांनी दिली. विधानपरिषद आ.प्रशांत परिचारक यांच्या आमदार फंडातून निमगाव,इस्लामपूर,गारवाड,पठाणवस्ती येथे चार हायमास्ट दिवे बसविण्यासाठी 6 लाख रूपये मंजूर झाले आहेत.तसेच के.के.पाटील यांच्या प्रयत्नातून यापूर्वीच अकलूज-निमगाव पिलीव-बचेरी या रस्त्यासाठी 5 कोटी 40 लाख रूपये तर जांभुड-खंडाळी-निमगाव-मळोली या रस्त्यांसाठी 2 कोटी 50 लाख रूपये मंजूर झाले आहेत.