
आठशे फूट खोल दरीत कोसळली कार!
सीआरपीएफ जवानासह पाचजणांचा मृत्यू!
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जम्मू:
जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर रामबन जिल्ह्यात इनोव्हा कार दरीत कोसळली. या दुर्घटनेमध्ये सीआरपीएफ जवानांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे व एकजण जखमी आहे. रामबन जिल्ह्यातील डिगडोल परिसरात ही घटना घडली.
चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे इनोव्हा कार ८०० फूट खोल दरीत कोसळली. महामार्गावरील लोकांनी या अपघाताची माहिती पोलिसांना दिली. तातडीने घटनास्थळी पोहोचून पोलिस आणि सुरक्षा दलाने मदत कार्य सुरू केले. कारमध्ये सहाजण प्रवास करीत होते. ते सर्वजण श्रीनगरहून जम्मूकडे जात होते.यातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे व अन्य एकजण जखमी आहे.

संबंधित बातम्या
गलाई बांधवच माणदेशाच्या आर्थिक विकासाचा कणा
तळेवाडी-आटपाडीच्या भाऊ-बहिणीची गरुडभरारी !
‘गाव लय भारी’!