राज्यातील ‘या’ १० जिल्ह्यांतील निर्बंध अधिक कठोर करण्याच्या सूचना!

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/मुंबई:
कोरोनाची दुसरी लाट सुरू असतानाच महाराष्ट्रासह १० राज्यातील ४६ जिल्ह्यांमध्ये संसर्गाचा दर १० टक्क्यांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे आयसीएमआरने या ४६ जिल्ह्यांमध्ये निर्बंध अधिक कठोर करण्याच्या सूचना केल्या आहेत.

महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, अहमदनगर व बीड या ९ जिल्ह्यांचा समावेश आहे.
नियंत्रणात आलेला कोरोना पुन्हा डोके वर काढत आहे. दुसऱ्या लाटेचा शेवट होत असतानाच तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुसरी लाट अद्याप संपलेली नाही. यातच महाराष्ट्रासह देशातील १० राज्यातील ४६ जिल्ह्यामध्ये संसर्गाचा दर १० टक्क्यांच्या पुढे गेला आहे.त्यामुळे आरोग्य यंत्रणा चिंतेत आहे. ही धोकादायक परिस्थिती पाहता आयसीएमआरने या ४६ जिल्ह्यांमध्ये निर्बंध अधिक कठोर करण्याच्या सूचना केल्या आहेत.
महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, अहमदनगर व बीड या नऊ जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे.
केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक, ओडिशा, तमिळनाडू, आसाम, मिझोराम, मेघालय, आंध्र प्रदेश व मणिपूर या दहा राज्यांचा यामध्ये समावेश आहे.
भारतातील ४६ जिल्ह्यांमध्ये १० टक्के पेक्षा अधिक तर इतर ५३ जिल्ह्यामध्ये ५ ते १० टक्के संसर्गाचा दर आहे. महाराष्ट्रामध्ये रुग्णसंख्या अधिक वाढू लागली तर केरळमध्ये दोन दिवसाचा लॉकडाऊन केल्याप्रमाणे महाराष्ट्रातही अशी वेळ येण्याची चिन्हे आहेत.
रुग्णालयातील सुविधा, ऑक्सिजन यंत्रणा, त्यांची देखभाल याबाबतची माहिती केंद्राला त्वरित कळवण्याचे सांगण्यात आले आहे. गृह विलगीकरणामध्ये असलेले कोरोनाबाधित लोक कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर पडून लोकांमध्ये मिसळू देऊ नयेत, याकडे लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.