संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /माळशिरस:
भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष आ. योगेश आण्णा टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख यांनी ओबीसी समाजाच्या हक्काचे आरक्षण मिळणेबाबतचे निवेदन तहसिलदार जगदीश निंबाळकर यांना देण्यात आले. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसी समाजाला असलेले राजकीय आरक्षण यासंदर्भात सरकारची पुनर्विचार याचिका फेटाळली आहे. दि. १२ डिसेंबर२०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाने लवकरात लवकर ‘राज्य मागासवर्गीय आयोगाचे’गठन करण्याचे आदेश सरकारला दिले होते. तसेच राज्यातील ओबीसी समाजाला’Emprirical Data’जमा करून तो न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले होते . परंतु जवळपास १५ महिने होऊन गेले तरी सरकारने अजून गठन केले नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे. १२ डिसेंबर नंतरही सर्वोच्च न्यायालयाने १०-१२ तारखा देऊनही सरकार एकाही तारखेस हजर राहिले नाही. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही ५-७ वेळा पत्राद्वारे उच्च न्यायालयाचे गांभीर्य लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला. तसेच भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने अनेकवेळा पत्रव्यवहार केला. परंतु एकाही पत्राचे उत्तर दिले नाही. ओबीसी समाजाला सरकार शुल्लक समजत आहे. तसेच सरकारने सर्वोच्च न्यायालायचाही वारंवार अवमान केला आहे . त्यामुळे याचा फटका ओबीसी समाजाला बसला आहे. लवकरात लवकर यावर ठोस कार्यवाही करा अन्यथा लाखोंच्या संख्येने ओबीसी समाज आंदोलनासाठी रस्त्यावर उतरेल अशी चेतावणी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्च्याच्या वतीने देण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या निष्काळजी व नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचे राजकिय आरक्षण रद्द होऊन संपुष्टात आले आहे.त्यामुळे या नाकर्त्या सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्च्यांचे प्रदेशाध्यक्ष आ . योगेश आण्णा टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन