आटपाडीत काँग्रेसच्यावतीने अपयशी भाजपप्रणित केंद्र सरकारचा निषेध

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:
आटपाडी तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने भाजपप्रणित केंद्र सरकारचा निषेध करीत आटपाडी येथे वाढती महागाई,बेरोजगारी यासारख्या प्रश्नांवर प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले.आटपाडी तालुकाध्यक्ष डी.एम.पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात सांगली जिल्हा सरचिटणीस संजय खटके,व्ही.एम. देशमुख, काँग्रेसचे समन्वयक प्रा.मोहन खरात, ग्रामपंचायत सदस्य गोरख बाबर, सेवादल सदस्य संजय भिंगे,आदि काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.भाजपप्रणित केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कायदे, कोरोना महामारी रोखण्यात सरकारला आलेले अपयश, नोटाबंदी, पेट्रोल व डिझेल व इंधनाचे वाढणारे भरमसाठ दर, वाढती महागाई,देशाची ढासळलेली अर्थव्यवस्था, संपूर्ण देशात वाढती बेरोजगारी, जगभरात भारताची झालेली नामुष्की,मोदी सरकारने विकायला काढलेले रेल्वे, विमानतळ, बंदरे, बी एस एन एल कंपनी, पेट्रोलियम कंपन्या, बँका, या सर्व गोष्टींच्या अनुषंगाने अपयशी भाजपप्रणीत केंद्र सरकारचा निषेध यावेळी करण्यात आला.