मोदी सरकारच्या सप्तवर्षपूर्ती निमित्त मांडकीत आरोग्य साधनांचे वाटप

संजय हुलगे

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस  :   

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला सात वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी माळशिरस तालुका व जिल्हा परिषद सदस्या ज्योती पाटील यांच्या वतीने मांडकी प्राथमिक आरोग्‍य केंद्र व माळशिरस येथील शासकीय रुग्णालयात येथे मास्क, सॅनिटायझर , ग्लोव्हज ,पल्स ऑक्सिमिटर व फळे वाटप करण्यात आले.यावेळी भाजपचे जिल्हा सहप्रभारी के.के.पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सोपान नारनवर, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, ओबीसी मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वावरे, तालुका संघटन सरचिटणीस संजय देशमुख, तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण माने ,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष दादासाहेब खरात, मिनीनाथ मगर आदी मान्यवर उपस्थित होते.     यावेळी मांडकी येथे वैद्यकीय अधिकारी डाॅ.वसंत भोसले, डाॅ.शेंडगे,डाॅ.अशोक धाईजे,डाॅ.साळवे, डाॅ.अक्षय जाधव,डाॅ.सुषमा धाईजे व माळशिरस येथे डाॅ.दोशी आदि उपस्थित होते.