
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /निंबवडे:
निंबवडे येथे झालेल्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत आमदार गोपीचंद पडळकर प्रणित भाजपच्या उमेदवाराचा विजय झाला.उपसरपंचपदी सौ.मंगल धोंडिबा मेटकरी यांची निवड झाली.
निंबवडे येथे सरपंचपदी पडळकर गटाच्या नंदाताई देठे या कार्यरत आहेत. अतिशय नाट्यपूर्ण घडामोडीत सौ.मंगल मेटकरी यांनी भाजपकडून उपसरपंचपदी अर्ज सादर केला. यावेळी शिवसेनेकडून सचिन मोटे यांनी अर्ज सादर केला. या सरळ लढतीत सौ. मंगल मेटकरी यांनी बाजी मारली.एका सर्वसामान्य घरातील स्त्री उपसरपंच झाल्याने सर्वत्र आनंद व्यक्त होत असून गावकऱ्यांनी दोन्ही पदे स्त्रियांकडे गेल्याने समाधान व्यक्त केले आहे. या निवडीने सामान्य लोकांना पदाच्या संधी मिळतात,असा आत्मविश्वास पेरण्यात भाजप यशस्वी झाला आहे.
या निवडीसाठी आमदार गोपिचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपा नेते जयवंतराव सरगर, माजी सरपंच धुळदेव देवडकर,माजी सरपंच मंगेश मगदूम,सचिन आप्पा मोटे,रमजान तांबोळी,बाबासाहेब बुधावले,कुंडलिक पिंजारी,युवा नेते विक्रम देवडकर यांनी निर्णायक भूमिका बजावली. या निवडीनंतर आमदार गोपीचंद पडळकर बोलताना म्हणाले, विक्रम देवडकर या निष्ठावान मावळ्याने समजदारी दाखवत आपल्या निष्ठा व्यक्त केल्या आहेत .सर्वांनीच मोलाची साथ दिली आहे. मी मनापासून सदस्यांचे अभिनंदन करतो.निवडीनंतर कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.


संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन