
*आटपाडी तालुका : कोरोनायन* दि.३०/०५/२०२१
मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:
आटपाडी तालुक्यात आज दि.३० रोजी नव्याने ४६ लोकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत,तर ७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये २० पुरुष असून २६ स्त्रियांचा समावेश आहे.यापैकी आटपाडी तालुक्यातील ४१ व तालुक्याबाहेरील ५ व्यक्तींचा समावेश आहे.अँटीजन चाचणीद्वारे ३९ जणांचे व आरटीपीसीआर चाचणीद्वारे ७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.नव्याने पॉझिटिव्ह सापडलेल्या व्यक्तींपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक व दिलासादायक आहे.आटपाडीचे तहसीलदार तथा तालुका इन्सिडंट कमांडर सचिन मुळीक, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सौ.साधना पवार, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.इम्रान तांबोळी,तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व वैद्यकीय अधिकारी, सर्व आरोग्य कर्मचारी,पोलीस प्रशासन व इतर प्रशासकीय स्टाफ यांनी रात्रंदिवस केलेल्या संयुक्तिक प्रयत्नातून आटपाडी तालुक्यात कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी यश येऊ लागले आहे.नागरिकांनीही प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजवावी असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. जिल्ह्यात १ जून रोजी सकाळी ७.०० वाजेपर्यंत पुन्हा नवे निर्बंध म्हणजेच लॉकडाऊन लागू केले आहे. याचाही परिणाम कोरोना प्रतिबंधासाठी होणार आहे.
आटपाडी तालुका : कोरोनायन (गावनिहाय आकडेवारी दि.३० मे,२०२१)
आटपाडी 2
खरसुंडी 4
दिघंची 8
झरे 4
कौठुळी 6
गोमेवाडी 3
नेलकरंजी 2
विठलापूर 2
गळवेवाडी 7
पुजारवाडी(दि) 1
पुजारवाडी(आ) 2
अचकदाणी 1
लोटेवाडी 2
कटफळ 2

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर