१२०४ कोरोनामुक्त; ३७ जणांचा मृत्यू तर १०७८ नवे पॉझिटिव्ह

सांगली जिल्हा : कोरोनायन दि.२९/०५/२०२१ 

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:

सांगली जिल्ह्यात आज दि.२९ रोजी १२०४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.३७ कोरोनाबाधितांचा  मृत्यू झाला असून नव्याने १०७८ रुग्ण सापडले आहेत.सद्यस्थितीत सांगली जिल्ह्यात १२ हजार ५५२कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहे.आजअखेर एक लाख ५८८ रुग्ण बरे झाले असून ३३७४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजतागायत एक लाख १६ हजार ५१४ कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून सद्यस्थितीत १८७८ पॉझिटिव्ह रुग्ण चिंताजनक आहेत.पॉझिटिव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात ऑक्सीजनवर १६०७, हाय-फ्लो नेझल ऑक्सीजनवर २२ आणि व्हेंटिलेटरवर २४९ रुग्ण आहेत.

सांगली जिल्हा:कोरोनायन (तालुकानिहाय पॉझिटिव्ह  रुग्ण व मृत्यू आकडेवारी) दि.२९/०५/२०२१

आटपाडी ३८ (मृत्यू १)
जत ८५ (मृत्यू ३)
कडेगाव ८९ (१)
कवठेमहांकाळ ६४ (१)
खानापूर ६८ (३)
मिरज १५२ (७)
पलूस १०७ (०)
शिराळा १०१ (२)
तासगाव ४५ (२)
वाळवा १६९ (६)
सांगली,मिरज महानगरपालिका १६०
(सांगली-१०२ ,मिरज-५८)
(मृत्यू: सांगली-६, मिरज-५ ,कुपवाड-०)
एकूण १०७८ (मृत्यू-३७)