खाजगी क्लास चालकांचे आर्थिक गणित कोलमडले!
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
मागील वर्षी २२ मार्चपासून क्लासेसवर शासनाने बंधने घातली.त्यामुळे विद्यार्थ्यांना या परीक्षा देता येत नाहीत.जत तालुक्यात 40 पेक्षा जास्त क्लासेस आहेत.या क्लासेसमध्ये साधारणत: दरवर्षी 5 -10 हजारापेक्षा जास्त विद्यार्थी प्रवेश घेत असतात. त्यातल्या-त्यात मार्च,एप्रिल आणि मे या कालावधीत जास्त प्रवेश होत असतो.मार्च, एप्रिल आणि मे या कालावधीत होणाऱ्या प्रवेशातून वर्षभरातील एकूण उत्पन्नाच्या ७० ते ८० टक्के उत्पन्न या काळात क्लासचालकांना होत असते. त्याच्या जोरावरच वर्षभर हे क्लासेस सुरू असतात.मात्र मागील वर्षी आणि यावर्षी असं सलग दोन वर्ष मेगा बॅच न मिळाल्याने क्लासचालक हवालदिल झाले आहेत.सुशिक्षित तरुणांनी राज्यभर हे क्लासेस सुरू केले आहेत.शासनाने क्लासेस सुरू करण्याची परवानगी देऊन उपासमार थांबवावी,अशी मागणी होत आहे.सध्या जागेचे भाडे,प्रशिक्षकांचे वेतन,दुरुस्ती-देखभाल यांचा खर्च,लाइट बिल आणि कर्जाचे असे एक ना अनेक खर्च चालूच आहेत,हे काही चुकले नाही. हे खर्च चालकांना आता परवडेनासे झाले आहेत. यापुढेही क्लास सुरू होण्याची शाश्वती नसल्याने बँकांचे हप्ते भरायचे कसे,कुटुंब निर्वाह कसा करायचा ? हा प्रश्न निर्माण झाला आहे. क्लास बंद पडल्यास या सर्व तरुण शिक्षकांचा प्रवास बेरोजगारीच्या दिशेने होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या
भारती विद्यापीठ इंग्लिश मेडीयम स्कुल लोहेगाव पुणे येथे सीबीएसइ चे सीओइ प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात गुरूकुल विद्यालयाचे सुयश
लिंगीवरे येथील धुळाजीराव झिंबल विद्यालयाचे विज्ञान प्रदर्शनात यश