
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ सांगली:
राज्यातील हजारो माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे पगार एप्रिल पेड इन मे ची १४ तारीख आली तरी सुध्दा,पगार झालेला नाही,त्यामुळे शिक्षकांसमोर खूपच मोठ्ठी समस्या निर्माण झालेली आहे.
तसेच गेल्या तीन महिन्यापासून शिक्षकांचे पगार वेळेवर होत नाहीत व गेल्या दोन महिन्यात शिक्षकांच्या पगारातून इन्कम टॅक्स मोठया प्रमाणात कपात करण्यात आली, लगेचच मार्च एंड लागले, त्यामूळे शिक्षकांची गेल्या तीन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात आर्थिक कुचंबना होत आहे.
तसेच शिक्षकांनी काढलेले कर्ज आणि त्या कर्जाला वेळेवर हप्ते पोहोचत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात कर्जाच्या व्याजाचा भुर्दंड शिक्षकांच्या माथी बसत आहे. त्यातच अनेक शिक्षक व शिक्षकांच्या कुटुंबाला मोठ्या प्रमाणात कोरोना विळखा घालत आहे, त्यामुळे शिक्षकांना वैद्यकीय खर्च खूपच लागत आहे. वरुन पगार वेळेवर होत नाही,त्यामूळे शिक्षकांची आर्थिक परिस्थित खूपच बिकट झालेली आहे.
त्यासाठी महाराष्ट्र राज्य डी सी पी एस संघर्ष समितीकडून शिक्षकांच्या पगारासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा व शिक्षकांची आर्थिक संकटापासून सुटका करावी अशी मागणी शासनाकडे केली असल्याची माहिती संघर्ष समितीचे सांगली जिल्हाध्यक्ष बापू दाभाडे यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या
भारती विद्यापीठ इंग्लिश मेडीयम स्कुल लोहेगाव पुणे येथे सीबीएसइ चे सीओइ प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात गुरूकुल विद्यालयाचे सुयश
लिंगीवरे येथील धुळाजीराव झिंबल विद्यालयाचे विज्ञान प्रदर्शनात यश