३४ जणांचा मृत्यू तर १३०४ नवे पॉझिटिव्ह;१२९१कोरोनामुक्त

सांगली जिल्हा : कोरोनायन दि.२०/०५/२०२१ 
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:

सांगली जिल्ह्यात आज दि.२० रोजी ३४ कोरोनाबाधितांचा  मृत्यू झाला असून नव्याने १३०४ रुग्ण सापडले आहेत.तर आज जिल्ह्यात १२९१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.सद्यस्थितीत सांगली जिल्ह्यात १३ हजार ८५३कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहे.आजअखेर ८८ हजार ५७८ रुग्ण बरे झाले असून ३०८०
 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजतागायत एक लाख ५ हजार ५११ कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून सद्यस्थितीत २३१८ पॉझिटिव्ह रुग्ण चिंताजनक आहेत.पॉझिटिव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात ऑक्सीजनवर २००१, हाय-फ्लो नेझल ऑक्सीजनवर २९ आणि व्हेंटिलेटरवर २८८ रुग्ण आहेत.

सांगली जिल्हा:कोरोनायन (तालुकानिहाय पॉझिटिव्ह  रुग्ण व मृत्यू आकडेवारी) दि.२०/०५/२०२१

आटपाडी ८५ (मृत्यू १)         जत १५८ (मृत्यू ३)              कडेगाव १०३ (०)      कवठेमहांकाळ  ९० (२)          खानापूर  ११७ (७)        मिरज १२५ (५)        पलूस  २८ (१)          शिराळा ६२ (२)          तासगाव  १८९ (३)          वाळवा २१३ (४)      सांगली,मिरज महानगरपालिका  १३४  (सांगली-६९ ,मिरज-६५) (मृत्यू: सांगली-४, मिरज-० ,कुपवाड-२)


एकूण १३०४  (मृत्यू-३४)