
कोरोना काळात मदतीचा हात, गोरगरिबांच्या चुली पेटवण्यासाठी हणमंत सुखदेव मुढे यांचा पुढाकार
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/निंबवडे:
कोरोनाच्या महामारीची दुसरी लाट राज्यभर थैमान घालत आहे. सरकारने लॅाकडाऊन जाहीर केल्याने लोकांच्या दळणवळणावर मर्यादा आलेल्या असल्याने अनेक कुटुंब गर्भगळीत झाली आहेत. त्यातच अनेकांच्या पुढे चुली पेटवण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.अशावेळी महालक्ष्मी गोल्ड टंच सेंटर बोरिवली वेस्टचे मालक व मुढेवाडी गावचे सुपुत्र हणमंत सुखदेव मुढे यांनी 100 किराणा किट निंबवडे पंचक्रोशीसाठी दिलेली आहेत. त्यामुळे गरजू लोकांना दिलासा मिळाला आहे.


संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर