१७३४ कोरोनामुक्त; ३० जणांचा मृत्यू तर १३०१ नवे पॉझिटिव्ह

सांगली जिल्हा : कोरोनायन दि.१९/०५/२०२१

 प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:

सांगली जिल्ह्यात आज दि.१९ रोजी ३० कोरोनाबाधितांचा  मृत्यू झाला असून नव्याने १३०१ रुग्ण सापडले आहेत.तर आज जिल्ह्यात १७३४. रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.सद्यस्थितीत सांगली जिल्ह्यात १३ हजार ८७४ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहे.आजअखेर ८७ हजार २८७ रुग्ण बरे झाले असून ३०४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजतागायत एक लाख ४ हजार २०७ कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून सद्यस्थितीत २३३४ पॉझिटिव्ह रुग्ण चिंताजनक आहेत.पॉझिटिव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात ऑक्सीजनवर २०१३, हाय-फ्लो नेझल ऑक्सीजनवर ३३ आणि व्हेंटिलेटरवर २८८ रुग्ण आहेत.

सांगली जिल्हा:कोरोनायन (तालुकानिहाय पॉझिटिव्ह  रुग्ण व मृत्यू आकडेवारी) दि.१९/०५/२०२१

आटपाडी ९१ (मृत्यू १)         जत १८८ (मृत्यू ३)              कडेगाव ७७ (१)      कवठेमहांकाळ  ११८ (२)          खानापूर  १३१ (६)        मिरज  १३३ (६)       पलूस  ९० (०)          शिराळा ७३ (२)          तासगाव  १२७ (१)          वाळवा १२८ (७)  

   सांगली,मिरज महानगरपालिका १४५ (सांगली-७६ ,मिरज-६९) (मृत्यू: सांगली-१, मिरज-० ,कुपवाड-०)


एकूण १३०१  (मृत्यू-३०)