आटपाडी तालुक्यात कोरोनाचे १०१ पॉझिटिव्ह!

मोहनराव पुजारी

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:

आटपाडी तालुक्यात आज दि.१९ रोजी  101 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. 47 पुरुष व 53 स्त्रियांची आज कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. अँटीजन चाचणीद्वारे 56 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून यामध्ये 24 पुरुष व 32 स्त्रियांचा समावेश आहे. तर 45 जणांची RTPCR चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सौ.साधना पवार, तहसीलदार सचिन मुळीक यांच्यासह तालुक्यात ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व वैद्यकीय अधिकारी तसेच तालुक्यातील सर्व प्रशासकीय स्टाफ कोरोना नियंत्रणासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत आहे. आजपासून जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी यांनी सांगली जिल्ह्यात सात दिवसांचा दि.19 ते 26 मे या कालावधीत कडक लॉकडाऊन घोषित केला आहे. त्याचा सकारात्मक परिणाम जिल्ह्याबरोबरच तालुक्याच्याही रुग्णसंख्येवर होईल.


आटपाडी तालुका : कोरोनायन (गावनिहाय आकडेवारी दि.१९ मे,२०२१)

झरे 3
दिघंची 9
कौठुळी 11
चिंचाळे 1
माडगुळे 1
आवळाई 9
करगणी 2
लिंगीवरे 3
शेटफळे 1
हिवतड 7
औटेवाडी 2
खरसुंडी 1
खवासपूर 1
आटपाडी 20
राजेवाडी 7
निंबवडे 1
पात्रेवाडी 1
पळसखेल 1
नेलकरंजी 3
मापटेमळा 1
गळवेवाडी 2
पुजारवाडी(दि) 1
पुजारवाडी(आ) 2
खानजोडवाडी 2
देशमुखवाडी 1
लोटेवाडी 7
चोपडी 1