आटपाडी तालुक्यात कोरोनाचे फक्त 40 पॉझिटिव्ह! 106 बरे होऊन घरी!

मोहनराव पुजारी

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:

आटपाडी तालुक्यात आज दि.१८ रोजी कोरोनाच्या आकडेवारीने आणखी खूप दिलासा दिला असून आज 40 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आज तालुक्यात  106 रुग्ण  बरे होऊन घरी परतले आहेत.यामध्ये 27 पुरुष व 13 स्त्रियांचा यामध्ये समावेश आहे.यातील 40 जणांची अँटीजन कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सौ.साधना पवार, तहसीलदार सचिन मुळीक यांच्यासह तालुक्यात ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व वैद्यकीय अधिकारी तसेच तालुक्यातील सर्व प्रशासकीय स्टाफ कोरोना नियंत्रणासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत आहे. जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी यांनी पुन्हा सांगली जिल्ह्यात सात दिवसांचा दि.19 ते 26 मे या कालावधीत कडक लॉकडाऊन घोषित केला आहे. त्याचा सकारात्मक परिणाम जिल्ह्याबरोबरच तालुक्याच्याही रुग्णसंख्येवर होईल.


आटपाडी तालुका : कोरोनायन (गावनिहाय आकडेवारी दि.१८ मे,२०२१)

 झरे  2 दिघंची    11 चिंचाळे  2 कौठुळी   1 आटपाडी  5 लिंगीवरे  1 घाणंद  1   माडगुळे  3   राजेवाडी    2  बनपुरी  3 हिवतड   2 यपावाडी  1 उंबरगाव  2 इतर- लोटेवाडी   3 इंदापूर   1