प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/पुणे:
पुणे विभागाचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांना पुन्हा दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे.डॉ.दीपक म्हैसकर यांच्यानंतर सौरभ राव यांनी विभागीय आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला. कोरोना काळात त्यांनी चांगले काम केले. त्यादरम्यान त्यांना पहिल्यांदा कोरोनाची लागण झाली होती. त्यातून ते बरे झाले होते. त्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस पूर्ण केले आहेत. कोरोना नियंत्रणाच्या कामाच्या धावपळीत त्यांना आता पुन्हा दुसऱ्यांदा कोरोणाची बाधा झाली आहे.

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर