
मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:
आटपाडी तालुक्यात आज दि.१७ रोजी कोरोनाच्या आकडेवारीने आणखी दिलासा दिला असून आज 90 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.यामध्ये 46 पुरुष व 44 स्त्रियांचा यामध्ये समावेश आहे.यातील अँटीजन चाचणीद्वारे 51 व आरटीपीसीआर चाचणीद्वारे 39 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तालुक्यात आजही सर्वाधिक पॉझिटिव्ह 14 रुग्ण दिघंचीत सापडले आहेत. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सौ.साधना पवार, तहसीलदार सचिन मुळीक यांच्यासह तालुक्यात ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व वैद्यकीय अधिकारी तसेच तालुक्यातील सर्व प्रशासकीय स्टाफ कोरोना नियंत्रणासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत आहे. आज जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी यांनी पुन्हा सांगली जिल्ह्यात सात दिवसांचा दि.19 ते 26 मे या कालावधीत कडक लॉकडाऊन घोषित केला आहे. त्याचा सकारात्मक परिणाम जिल्ह्याबरोबरच तालुक्याच्याही रुग्णसंख्येवर होईल.
आटपाडी तालुका : कोरोनायन (गावनिहाय आकडेवारी दि.१७ मे,२०२१)
झरे 3 दिघंची 14 चिंचाळे 3 करगणी 2 आटपाडी 8. भिंगेवाडी 1. घाणंद 1. खरसुंडी 3. शेटफळे 6. तडवळे 2. राजेवाडी 1 निंबवडे 1. बोंबेवाडी 1. बनपुरी 3. . हिवतड 12. काळेवाडी 2. पिंपरी खु. 1. पिंपरी बु.2. उंबरगाव 1. नेलकरंजी 9. विठलापूर 2. देशमुखवाडी 5. खानजोडवाडी 1 लोटेवाडी 4 चोपडी 2

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर