मांडवे कोविड सेंटरला तालुक्याच्या उभय आमदारांची भेट

संजय हुलगे 

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:

रत्नत्रय  एज्युकेशन सोसायटी संचलित,रत्नत्रय इंग्लिश स्कूल मांडवे व ग्रामपंचायत मांडवे यांच्या संयुक्त विद्यमाने चालू करण्यात आलेल्या कोविड सेंटरला आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व आमदार राम सातपुते यांनी भेट दिली. यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिह मोहिते पाटील, पंचायत समिती सदस्य मानसिंग मोहिते,रत्नत्रय परिवारचे संस्थापक  अनंतलाल दोशी,श्री सन्मती सेवा दलाचे अध्यक्ष  विरकुमार दोशी,रत्नत्रय इंग्लिश स्कूल मांडवे चेअरमन प्रमोद दोशी, मांडवे ग्रामपंचायत संरपच हनमंत टेळे, जयवंत पालवे, बबनबापू पालवे,शंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामदास कणें, हरीभाऊ पालवे, माजी जिल्हा परिषद सदस्य बबनराव गायकवाड, ग्रा.प सदस्य रितेश पालवे ,संजय देवगुंडे ग्रामविकास अधिकारी भोसले, रत्नत्रय पंतसंस्थेचे सचिव  ज्ञानेश राऊत,मुख्याध्यापक अमित पाटील,कोवीड सेंटर मधील डॉक्टर व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.