
सांगली जिल्हा : कोरोनायन दि.१६/०५/२०२१
४७ जणांचा मृत्यू तर 1077 नवे पॉझिटिव्ह
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:
सांगली जिल्ह्यात दि. 16 रोजी 47 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून नव्याने 1077 रुग्ण सापडले आहेत.तर जिल्ह्यात 1793 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.जिल्ह्यात दररोजच्या पॉझिटिव्ह संख्येपेक्षा ही दिलासा देणारी आकडेवारी आहे.सद्यस्थितीत सांगली जिल्ह्यात 16 हजार 226 कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहे.आजअखेर 81 हजार 235 रुग्ण बरे झाले असून 2922 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजतागायत एक लाख 383 कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून सद्यस्थितीत 2560 पॉझिटिव्ह रुग्ण चिंताजनक आहेत.पॉझिटिव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात ऑक्सीजनवर 2215, हाय-फ्लो नेझल ऑक्सीजनवर 36 आणि व्हेंटिलेटरवर 309 रुग्ण आहेत.
सांगली जिल्हा:कोरोनायन (तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण व मृत्यू आकडेवारी) दि.१६/०५/२०२१
आटपाडी 98 (मृत्यू 0) जत 118 (मृत्यू 5) कडेगाव 50 (3) कवठेमहांकाळ 38 (1) खानापूर 70 (3) मिरज 150 (4) पलूस 33 (4) शिराळा 43 (1) तासगाव 181 (2) वाळवा 131 (11)
सांगली,मिरज महानगरपालिका 165(सांगली-108,मिरज-57) (मृत्यू: सांगली-16,मिरज-1,कुपवाड-2)
एकूण 1077 (मृत्यू-47)


संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर