
मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:
आटपाडी तालुक्यात कोरोना बाधितांच्या संख्येने आज दि. 14 मे रोजी दिलासा दिला आहे. काल 103 रुग्णसंख्येचा उसळलेला अहवाल आल्यानंतर आज 85 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यामध्ये 48 पुरुष व 37 स्त्री रुग्ण असून अँटीजन चाचणीद्वारे 46 तर आरटीपीसीआर चाचणीद्वारे 39 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. आटपाडी शहरात आज 13 जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सौ.साधना पवार यांच्यासह संपूर्ण आरोग्य विभागाची तालुक्यातील टीम कोरोना नियंत्रणासाठी व जनजागृतीसाठी रात्रंदिवस कार्यरत आहे.
आटपाडी तालुका : कोरणायन (गावनिहाय आकडेवारी)
दिघंची 8 आटपाडी 13 खरसुंडी 2 शेटफळे 3 देशमुखवाडी 1 आवळाई/पिसेवाडी 3 राजेवाडी 5 वाक्षेवाडी 1 मुढेवाडी 2 निंबवडे 7 पडळकरवाडी 1 पुजारवाडी (दि) 3 विभूतवाडी 1 बोंबेवाडी 2 लेंगरेवाडी 1 झरे 3 कौठुळी 3 उंबरगाव 2 नेलकरंजी 2 चिंचाळे 5 वलवण 2 गळवेवाडी 1 विठलापूर 1 मासाळवाडी 1 पारेकरवाडी 2 तडवळे 1 य पा वाडी 3 पात्रेवाडी 1 इतर 8 ( तालुका बाहेरील इतर गावातील तपासणी करण्यात आलेले 8 ) रुग्ण आढळून आले आहेत.

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर