
मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:
आटपाडी तालुक्यात कोरोना बाधितांच्या संख्येने आज दि. 13 मे रोजी पुन्हा उसळी घेऊन शतक पार केले आहे. काल अवघ्या 66 रुग्णसंख्येचा दिलासा देणारा अहवाल आल्यानंतर आज अचानक 103 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यामध्ये 54 पुरुष व 49 स्त्री रुग्ण असून एंटीजन चाचणीद्वारे 61 तर आरटीपीसीआर चाचणीद्वारे 42 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत.
आटपाडी शहराला लोकसंख्येच्या मानाने आज दिलासा मिळाला असून फक्त चौघांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर तालुक्यात दिघंची येथे सर्वाधिक म्हणजे 19 रुग्ण आढळून आले आहेत. त्या आकडेवारी पाठोपाठ हिवतडमध्ये 13 व शेटफळेमध्ये 10 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सौ.साधना पवार यांच्यासह संपूर्ण आरोग्य विभागाची तालुक्यातील टीम कोरोना नियंत्रणासाठी व जनजागृतीसाठी रात्रंदिवस कार्यरत आहे.
आटपाडी तालुका : कोरणायन (गावनिहाय आकडेवारी)
दिघंची 19
आटपाडी 4
मापटेमळा 1
राजेवाडी 6
आवळाई 3 / 6
खरसुंडी 1
पुजारवाडी(दि.) 4
पिसेवाडी 3
शेटफळे 10
लेंगरेवाडी 1
लिंगीवरे 1
उंबरगाव 2
हिवतड 13
पडळकरवाडी 4
विभूतवाडी 2
चिंचाळे 2
वलवण 1
घाणंद 2
विठलापूर 2
पळसखेल 1
पारेकरवाडी 2
तडवळे 1
नेलकरंजी 2
झरे 5
व तालुका बाहेरील इतर गावातील तपासणी करण्यात आलेले 11 रुग्ण आढळून आले आहेत.

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर