लसीकरण केंद्रावरच कोरोनाचा प्रसार धोकादायक; पुरोगामी संघर्ष परिषदेचा आरोप

लोकप्रतिनिधीनी लक्ष घालण्याची मागणी

नरेंद्र दीक्षित

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /आटपाडी:

कोरोना प्रतिबंधक लस 45 वर्षावरील व्यक्तींना देत असताना ग्रामीण भागांतील अज्ञान अजूनही पुढे आले आहे.व्यक्तींना इंटरनेटवरील रजिस्ट्रेशन माहीत नसल्यामुळे हे सर्व नागरिक लस केंद्रावर एकत्र येऊन गर्दी करतात.त्यातच 18 वर्षावरील तरुणपिढी रजिस्ट्रेशन करून आमचा नंबर अगोदर आहे,असा हक्क सांगतात.एक सुशिक्षित पिढी तर दुसरी अशिक्षित! याचा परिणाम लस केंद्रावर कोरोना प्रतिबंध होण्याऐवजी कोरोना वाढण्याचीच जास्त  भीती असल्याचा आरोप पुरोगामी संघर्ष परिषदेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष अमोल लांडगे यांनी केला आहे.  लांडगे पुढे म्हणाले, लसीकरण केंद्रावर लोकप्रतिनिधींनी स्वतःहून लक्ष घालण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत जर लोकप्रतिनिधी बाहेर येत नसतील तर या नागरिकांना दोष देण्यात काहीही अर्थ नाही. पुरोगामी संघर्ष परिषदेने याठिकाणी आंदोलन केल्यानंतर प्रशासन याला संपुर्णपणे जबाबदार असेल असा इशाराही देण्यात आला आहे