लसीकरण पूर्वीप्रमाणे ऑफलाइन करावे- विकास साबळे

अनिल मदने

 प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /जत: 

दोन दिवस सरकारी दवाखान्यात लसीकरण ऑनलाइन बुकिंग करून चालू केले आहे. परंतु बऱ्याचजणांना ऑनलाईन बुकींग करणे शक्य नाही.जत तालुक्यातील खेड्यातील जनता गाव, वाडी-वस्तीवर राहत असल्याने मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या कमी आहे.शिवाय जे मोबाईल वापरतात, त्यांच्या मोबाईलच्या रेंजचा प्रॉब्लेम असतो. त्यामुळे लसीचे ऑनलाईन बुकिंग करण्यासाठी अडचण येत आहे. शिवाय ऑनलाईन बुकिंग असल्यामुळे जत शहर व तालुक्यातील जनता सोडून जिल्हा व जिल्ह्याबाहेरील बरीच मंडळी ऑनलाईन बुकिंग करून घेण्यासाठी जत तालुक्यातील सरकारी दवाखान्यात येत आहेत. त्यामुळे तालुक्यातील स्थानिक लोकांना लसीपासून दूर राहावे लागत आहे.तालुक्याच्या वाट्याला आलेली लस ऑनलाइनच्या गोंधळामुळे जत तालुका सोडून बाहेरच्या लोकांना याचा उपयोग होऊ लागला आहे.त्यामुळे लसीपासून जत तालुक्यातील जनता वंचित राहून महामारीच्या आजाराला बळी पडण्याची शक्यता वाढली आहे., त्यामुळे प्रशासनाने पूर्वीप्रमाणे लसीकरण चालू करावे व तालुक्यातील अशिक्षित सुशिक्षित व सर्वसामान्य लोकांची 100% लसीकरण करून या रोगापासून लोकांना जीवदान द्यावे,अशी मागणी रिपाइंचे  सांगली जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे यांनी केली आहे.