कोविडसाठी आ.विक्रमदादांचा एक कोटींचा ‘बुस्टर’!

अनिल मदने

 प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ जत:       

जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार विक्रमसिंह  सावंत यांनी तालुक्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आपल्या आमदार निधीतून कोव्हिड १९ च्या आवश्यक सोई-सुविधांसाठी १ कोटीचा निधी दिला आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी यांना पत्रही दिले आहे. आमदार सावंत म्हणाले, जत मतदारसंघात कोरोना प्रादुर्भाव वाढत चालला आहे.त्यामुळे मतदारसंघातील ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सोई-सुविधा, आवश्यक साधनसामग्री देण्याकरिता आमदार स्थानिक विकास कार्यक्रम २०२१ -२२अंतर्गत १ कोटी रुपये मंजूर निधी खर्च करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने १० के .व्ही जनरेटर माडग्याळ ग्रामीण रुग्णलयासाठी ,प्लस ऑक्सी मीटर १५०,थर्मल गण १५०,ऑक्सीजन कोन्सन्ट्रेटिव १५ ,कापडी मास्क २००० ,एन ९५ मास्क ,सॅनिटाईझर 100 मी लि 50 ,सॅनिटाईझर 5 मी ली 50 ,ग्लोज 500 ,पी,पी, ई किट 1500 ,फेसशिल्ड 350, स्पेअरींग मशीन 100 तसेच शववाहिका व ऑक्सीजन जनरेशन देखील करण्यात आला आहे. कोव्हिडमध्ये कुठेही कमी पडणार नाही!आ.सावंत पुढे म्हणाले,गेल्या दोन वर्षांतून आपल्या तालुक्यात कोव्हिड रुग्णांची संख्या वाढत आहे. हा आजार नष्ट होईपर्यंत शासनाने घालून दिलेल्या नियमाचे पालन करावे. जत मतदारसंघात कोव्हिडसाठी जे काही लागेल ती मदत करण्यात कुठेही कमी पडणार नाही. आज माडग्याळ येथे 40 बेडचे रुग्णालय सुरू केले आहे.तसेच दत्त पतसंस्था ,विक्रम फौंडेशन यांचे वतीने डफळापुर  येथे 40 बेडचे रुग्णालय सुरू केले असून उमदी येथेही लवकरच 40 बेडचे रुग्णालय सुरू करीत आहोत. या गंभीर काळात सामाजिक संस्था, सर्व पक्षीय पदाधिकारी यांनी राजकारण न करता लोकांना मदतीचा हात द्यावा. ही लढाई सामूहिक आहे. लोकांचे प्राण वाचले पाहिजेत, यासाठी सर्वांनी काम करावे,असे आवाहन आ.विक्रसिंह सावंत यांनी केले आहे.