
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
शेड्याळ गावात कोरोनाचा शिरकाव झालेला आहे. कोरोनाचे 10 रुग्ण गावात सापडलेले आहेत. सर्व रुग्णांना होमकाॅरंटाईन करण्यात आलेले आहेत. हे सर्व रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्र वळसंग यांच्या नियंत्रणाखाली खाली आहे. सर्व रुग्णांच्या तब्येतीमध्ये चांगली सुधारणा होत आहे. त्यांना वेळेवर औषध उपचार मिळत आहे.गावात कोरोना संदर्भात जनजागृती करण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील या संदर्भात तातडीने कोरोणा संदर्भात कमिटीची मीटिंग बोलवण्यात आली.व तातडीने गावात औषध फवारणी करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते श्रीधर जमशेट्टी यांच्या वतीने मास्क वाटप करण्यात आले. ज्या परिसरात रुग्ण सापडले आहेत, त्या परिसरात औषध फवारणी करून सर्व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केली. कोरोना पॉझिटिव्ह झालेल्या रुग्णांना वेळेवर औषध उपचार मिळवून देणे व त्यांना सर्व रुग्णांना मानसिक आधार देणेसंदर्भात ग्रामपंचायतच्या वतीने सर्व सहकार्य रुग्णांना करत आहे.गावांमध्ये 18 वर्षावरील सर्व तरुण, युवक, ज्येष्ठ नागरिक या सर्वांनी लस घेण्यासंदर्भात जनजागृती करत आहेत. गावामध्ये एक दिवस मोफतच लस कॅम्प आयोजित करण्यासंदर्भात प्राथमिक आरोग्य केंद्र वळसंग यांना विनंती करण्यात आलेला आहे. पुढील काळात कोरोणाचा प्रादुर्भाव वाढल्यास काय उपाययोजना कराव्यात या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.यावेळी कमिटीचे अध्यक्ष सरपंच अशोक जाधव, उपसरपंच भगवानदास केंगार, ग्रामपंचायत सदस्य कर्यापा गुगवाड,ग्रामसेवक कादरखान नदाफ, कृषी विभागाचे जी. एस.हालकुंडे, या कमिटीचे सदस्य शंकर गुगवाड, पोलीस पाटील सुनीता जाधव, आशा वर्कर अनिता जाधव, अंगणवाडी सेविका अहिल्याबाई सातपुते,कोतवाल अनिता जाधव,ग्रामपंचायत कर्मचारी बीराप्पा जावीर,शंभू कसबे उपस्थित होते.

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर