संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /माळशिरस:
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे कोव्हीड सेंटर सुरू करण्याची मागणी पिलीव परीसरातील नागरिकांमधून होत आहे.माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे सध्या कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढत आहे. पिलीव येथील रुग्णांना माळशिरस, अकलूज,महाळुंग येथील कोव्हीड सेंटरला न्यावे लागत आहे.परंतु याठिकाणी सध्या बेड उपलब्ध होत नाहीत,अशी परिस्थिती आहे.यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत.तसेच पिलीवपासून ही सर्व गावे खुपचं लांब आहेत. त्यामुळे पेशंटला वेळेवर पोहचविणे अवघड होत आहे.त्यामुळे लवकरात लवकर प्रशासनाने लक्ष घालून कोव्हीड सेंटर सुरू करावे अशी नागरीकांतून मागणी होत आहे.पिलीव येथे कोव्हीड सेंटर सुरू व्हावे, यासाठी या भागाचे युवक नेते शिवराज पुकळे यांनी आमदार राम सातपुते यांच्याकडे मागणी केली होती.या मागणीचा विचार करून अकलूज येथे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता भरने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत आमदार राम सातपुते यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता.आता पिलीव येथे कोव्हीड सेंटर सुरू होईल का..? याकडे येथील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर