नेमका पालकमंत्री कोण? जयंतराव पाटील की त्यांचे ओएसडी अमोल डफळे ?

जतमध्ये पालकमंत्री जयंतराव पाटील की ओएसडी अमोल डफळे हेच समजेना? काँग्रेसचे अध्यक्ष आप्पाराया बिराजदार

अनिल मदने 

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व सांगलीचे पालकमंत्री जयंतराव पाटील यांचे ओएसडी अमोल डफळे शासकीय सेवेत असूनही राजकारणात हस्तक्षेप करतात,राष्ट्रवादीतर्फे अनेक कार्यक्रमांचे उद्घाटनही करतात. सांगलीचे पालकमंत्री जयंतराव पाटील की त्यांचे ओएसडी अमोल डफळे हेच समजेना? असे मत जत तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आप्पाराया बिराजदार यांनी व्यक्त केले.राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष,जलसंधारण मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंतराव पाटील हे आमच्या महाविकास आघाडीचे एक जेष्ठ नेते आहेत.आम्ही या पूर्वी कै.राजारामबापू पाटील यांचे अनुयायी आहे.त्यांच्याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे.सध्या ते पालकमंत्री असल्याबद्दल त्याचाही आम्हाला स्वाभिमान आहे.परंतु ते पालकमंत्री असल्याने त्यांच्याकडे शासकीय OSD म्हणून काम करणारे शासकीय अधिकारी अमोल डफळे हे जत तालुक्यातील उमराणी येथील रहिवाशी आहेत.ते शासकीय सेवेत असताना जत तालुक्यात राष्ट्रवादी पक्षाचा मी जणू पक्षाचा प्रमुख आहे,असे वर्तन करतात.राष्ट्रवादी पक्षाचे अनेक कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून उपस्थित राहून तालुक्यात स्वतःचे वर्चस्व उभा करणे,अशाप्रकारे ते काम करतात.अशा एखाद्या शासकीय अधिकाऱ्याला एखाद्या राजकीय पक्षाचे काम करणे हे संविधान कायद्याप्रमाणे योग्य आहे का ? असे खरे असेल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधनाप्रमाणे त्यांच्यावर शासन योग्य कार्यवाही करणार का ? अमोल डफळे हे शासकीय सेवेतून मुक्त होऊन राजकारणाची आवड असेल तर समाजसेवा करणेसाठी त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून निवडणूक लढवावी,असे आवाहन मी करतो.सध्या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मीच असल्याचे समजून ते  जत तालुक्यात राजकारणात व समाजात हस्तक्षेप करत आहेत.त्याला वेळीच पालकमंत्री जयंतराव पाटील यांनी शासकीय OSD यांच्यावर वेळीच आवर घालावा, अशी विनंती जत तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आप्पाराया बिरादार यांनी केली आहे.जत तालुक्यासाठी पालकमंत्री जयंत पाटील का डफळे हेच समजत नाही? असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.