आटपाडी पं.स.च्या सभापतीपदी सौ.पुष्पाताई जयवंतराव सरगर यांची निवड

नरेंद्र दिक्षीत
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /आटपाडी:

आटपाडी पंचायत समितीच्या सभापतीपदी निंबवडे गणातील सदस्या सौ.पुष्पाताई जयवंतराव सरगर यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली.
आमदार गोपीचंद पडळकर, माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, भूमिकाताई बेरगळ, भाजपा नेते जयवंतराव सरगर, रुपेश पाटील, तालुकाध्यक्ष उमाजी सरगर, शिक्षक नेते यु.टी.जाधव, जिल्हा परिषद सदस्य अरुण बालटे,मोहनराव रणदिवे, यांच्यासह नेते व युवा कार्यकर्ते उपस्थित होते.
सौ.सरगर यांची निवड झाल्याचे घोषित होताच युवकांनी फटाक्यांची आतषबाजी व जल्लोष केला. मान्यवरांच्या हस्ते सरगर दाम्पत्यांचा सत्कार करण्यात आला.
उपसभापतीपद मिळाल्यानंतर व आपल्या सदस्यत्वाच्या कालखंडामध्ये त्यांनी अनेक विकास कामे केली. गोरगरीब जनतेच्या कामामध्ये लक्ष घालून त्यांना न्याय दिला. युवा नेते जयवंतराव सरगर यांनी आपल्या जनसंपर्काच्या माध्यमातून लोकविकास केला. त्यांच्या या कार्याची परिणीती म्हणून त्यांना सभापती पदाची संधी मिळाली.