आता कंटेनमेंट झोनचे अधिकार तहसिलदारांना!

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवरकंटेनमेंट झोन घोषित व रद्द करण्याचे अधिकार तहसिलदार यांना प्रदान                                जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी महानगरपालिका क्षेत्रात आयुक्त यांना अधिकार

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली : 

सद्यस्थितीत कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणावर झपाट्याने वाढत असल्याने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगली,मिरज,कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्र वगळून, जिल्ह्यातील कोरोना रुग्ण आढळलेल्या ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र (कंटेनमेंट झोन) अधिसूचना प्रसिद्ध करणे व शासन निर्देशानुसार विहित कालावधीनंतर सदर अधिसूचना रद्द करण्यासाठी सबंधित तहसिलदार यांना त्यांच्या कार्यक्षेत्रासाठी अधिकार प्रदान केले आहेत. तसेच  महाराष्ट्र शासनाच्या दि. 31 मे 2020 च्या आदेशानुसार महानगरपालिका क्षेत्रात आयुक्त, सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका यांनी प्रतिबंधित क्षेत्र  घोषित करणे व रद्द करण्याची कार्यवाही करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत. राज्य शासनाकडून राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात येत आहेत. तसेच राज्य शासनाचे निर्देशाप्रमाणे जिल्ह्यात कोरोना विषाणूचे रुग्ण आढळलेल्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून प्रतिबंधित क्षेत्र  केले जातात. त्याअनुषंगाने यापूर्वी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्र वगळून, जिल्हयातील कोरोना रुग्ण आढळलेल्या ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र अधिसूचना प्रसिद्ध करणे व शासन निर्देशानुसार विहित कालावधी नंतर सदर अधिसूचना रद्द करण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांना व महानगरपालिका क्षेत्रात आयुक्त, सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका यांनी प्रतिबंधित क्षेत्र घोषित करणे व रद्द करण्याबाबत अधिकार प्रदान करण्यात आले होते.