
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी: ग्रामपंचायत निंबवडे येथे आटपाडी तालुक्याचे तहसीलदार सचिन मुळीक यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता व उपाययोजना करण्याकरीता व आपत्ती व्यवस्थापन समितीला सूचना देण्याकरीता आढावा बैठक आयोजित करण्यात आली. भाजपा नेते जयवंतभाऊ सरगर, ग्रामपंचायत सदस्य अमर मुढे, सदस्य गणेश कबीर, सदस्य सरताज तांबोळी, पोलिस पाटील प्रवीण मंडले, निंबवडे उपकेंद्रातील आरोग्यसेवक डॉ. संजय कदम, डॉ. लवटे व ग्रामपंचायत कर्मचारी,अंगणवाडी सेविका,आशा सेविका,कोतवाल पोपट वाघमारे व ग्रामस्थ आढावा बैठकीला उपस्थित होते.

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर