संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:
गोरडवाडी येथे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कोवीड १९ तपासणी शिबीरामध्ये एकुण ७० लोकांची तपासणी करण्यात आली . त्यापैकी RTPCR ३५ , RAT ३५ टेस्ट करण्यात आल्या.इस्लामपूर येथील १ व्यक्ती पॉजीटिव्ह आली आहे. गोरडवाडी ग्रामसुरक्षा समितीने चांगले सहकार्य करून गावातील व्यवस्थाही उत्तम प्रकारे ठेवलेली आहे.या शिबीरासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र माणकी येथील आरोग्य सेविका एल . व्ही. कोरडकर यांनी स्वाब घेतले. आरोग्य सहाय्यक एस . डी . कावळे , आरोग्य सेवक आर . बी . बंडगर , आरोग्य सेवक व्ही.ए. कांबळे , अंजना निबांळकर , आशा स्वयंसेविका ताई कर्णवर , पोलीस पाटील नानासाहेब यमगर , सरपंच बाळासाहेब गोरड , उपसरपंच दिपक गोरड , विजय गोरड , प्रा. शरदजी कर्णवर , प्रा . दादा यमगर , ब्रम्हदेव हुलगे, संतोष हुलगे , गोरख गोरड व गावातील लोकांनी चांगला प्रतिसाद दिला .

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर