माडगुळे उपकेंद्रात आजपासून लसीकरण

नंदकुमार विभुते
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:

माडगुळे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे आजपासून covid-19 ही कोरोना प्रतिबंधक लस गावातील वय वर्ष ४५ वरील सर्व लोकांना देण्यात येणार आहे. माडगुळे ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असे आवाहन माडगुळे ग्रामपंचायत,प्राथमिक आरोग्य केंद्र,आटपाडी व उपकेंद्र माडगुळे यांच्या वतीने करण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.उमाकांत कदम यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली हे लसीकरण करण्यात येणार आहे.