महामारी रोखण्याची धुरा ग्रामदक्षता समीतीने खांद्यावर घ्यावी : अर्जुनसिंह मोहिते पाटील
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:
माळशिरस तालुक्यात कोरोना महामारीला रोखण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. तरीही रुग्णांची ग्रामीण भागातील वाढणारी संख्या लक्षात घेता प्रशासकीय यंत्रणेवर मोठा ताण वाढत आहे. त्यामुळे आता आपला गाव वाचवण्यासाठी आपणच पुढाकार घेण्याची गरज असून ग्रामदक्षता समिती यांनी कोरोना रोखण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेण्याची गरज असल्याचे मत माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी व्यक्त केले.
तालुक्यात बहुतांश हॉस्पीटलमध्ये वाढत्या रूग्णांसाठी बेड मिळणे मुश्कील होत आहे. तालुक्यात कोव्हीड केअर सेंटरमध्ये १०० बेड, खाजगी ३२७ बेड, ग्रामीण रूग्णालयात १५ बेड तर खाजगी रुग्णालयात व्हेंटीलेटर ४४ बेड उपलब्ध आहेत. ही संख्या वाढत्या कोव्हीड १९ च्या प्रकरणांमुळे कमी पडत असल्यामुळे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रयत्नातून नव्याने ४०० बेड असलेले कोविड सेंटर लवकरच सुुरू होणार असल्याची माहिती यावेळी अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी दिली. त्यामुळे ग्रामदक्षता समिती आणि पोलिस पाटील यांनी पहिल्यासारखा सक्रिय होणे गरजेचे आहे
मेडीकल हब व्हेंटीलेटरवर
अकलूज आसपासच्या जिल्ह्यातील प्रमुख मेडिकल हब म्हणून ओळखले जाते.याठिकाणी दररोज शेकडो रुग्ण वेगवेगळ्या रोगांवर उपचार घेत असतात. मात्र सध्या कोरोना महामारीमुळे या रुग्णालयात आसपासच्या जिल्ह्यातील रुग्णांची गर्दी वाढल्यामुळे या रुग्णालयांवर मोठा ताण निर्माण झाला आहे.अकलुज, माळशिरस,नातेपुते, मांडवे, सदाशिवनगर,पिलीव, पिंपरीसह काही गावे आघाडीवर आहेत. तर मोटेवाडी,कळंबोली,भांब, जळभावी, धानोरेसह काही गावे अद्याप शुन्यावर आहेत. त्यामुळे मेडिकल हब सध्या व्हेंटिलेटरवर आला आहे.
गावोगावी दक्षता घेण्याची गरज
बाहेरगावाहुन येणाऱ्या नागरिकांमुळे कोरोना संसर्ग वाढण्यास मदत होत असल्याने ग्रामदक्षता समितीने आणि पोलिस पाटील यांनी बाहेरगावाहून आलेल्या व्यक्तींना कोवीड सेंटरमध्ये विलगीकरण करणे,अशा व्यक्तींची कोरोना टेस्ट करून त्या व्यक्तींना १४ दिवसांसाठी कोरोंटाईन करणे,आदि गोष्टीवर मार्गदर्शन करण्यात आलेचे पञकार परिषदेत सांगितले.यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ.रामचंद्र मोहिते,सहाय्यक गटविकास अधिकारी शिवाजी पाटील उपस्थित होते.

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर