मुढेवाडीच्या कुणाल आंधळे याची सैनिक स्कूलसाठी निवड

सभापती सौ.पुष्पाताई सरगर यांनी केले अभिनंदन, भाजपा नेते जयवंतराव सरगर यांनी केला सत्कार
मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:

आटपाडी तालुक्यातील मुढेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकणारा विद्यार्थी कुणाल अजिनाथ आंधळे  याची सैनिक स्कूल सातारा येथे निवड झाली आहे. त्याने लेखी परिक्षेतून ऑल इंडिया सैनिक स्कूल सातारा येथे ओबीसी प्रवर्गातून राज्यात 27 वा क्रमांक प्राप्त केला आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते जयवंतराव सरगर यांच्या हस्ते त्याचा कुणाल व त्याचे पालक आजिनाथ आंधळे यांचा  सत्कार करण्यात आला. आटपाडी पंचायत समितीच्या सभापती सौ.पुष्पाताई जयवंतराव सरगर यांनी त्याचे अभिनंदन केले.
यावेळी जिल्हा परिषद शाळा मुढेवाडीचे मुख्याध्यापक व कुणालचे मार्गदर्शक शिक्षक रावसाहेब देवडकर,नाना झुरे, निंबवडे ग्रामपंचायतीचे सदस्य कुंडलिक पिंजारी, युवा नेते धनाजी पाटील, राघव मेटकरी, आदि मान्यवर उपस्थित होते.
या परीक्षेसाठी कुणालला रावसाहेब देवडकर, बाड सर व कुणालचे वडील आंधळे सर यांचे मार्गदर्शन लाभले.