बेटी ने पुरा किया बाप का सपना!

जतच्या कु.मेहेजबीन रफिक मुजावरचे सेट परीक्षेत यश संपादन
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

जत येथील कु.मेहेजबीन रफिक मुजावर यांनी जून २०२० मध्ये झालेल्या सेट परीक्षेत यश संपादन केले आहे. सेट परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाल्या आहेत. या परीक्षेचा निकाल नुकताच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आला आहे. पदवीचे शिक्षण हे राजे रामराव महाविद्यालय, जत येथे पूर्ण झाले. तर पदव्युत्तरचे शिक्षण शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे पूर्ण झाले आहे. २०१७ मध्ये बी.एस्सी. विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाल्यानंतर कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून एम.एस्सी. विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत. नुकत्याच झालेल्या सेट परीक्षेत त्यांनी यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
कु. मेहेजबीन रफिक मुजावर या राजे रामराव महाविद्यालय, जत येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. तर पीएचडीचे संशोधन डॉ.शिवाजी कुलाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. त्यांच्या या यशाबद्दल राजे रामराव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एस.पाटील, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.शिवाजी कुलाळ, डॉ.ए.एम.सरगर, डॉ. संजय लठ्ठे, प्रा.के.के रानगर, प्रा.दिपक कुंभार व प्रा.गोविद साळूखे यांनी अभिनंदन केले.
बेटी ने पुरा किया बाप का सपना!

दुष्काळी जतसारख्या भागातून रसायनशास्त्र विषयात पदवी संपादन केली. जिद्द व कष्टाच्या जोरावर आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. आपल्या परिश्रमाचे चीज करून रसायनशास्त्र विषयाची आवड जोपासत आणि आपले ध्येय डोळ्यासमोर ठेवून मेहेजबीन मुजावर यांनी रसायनशास्त्र या विषयात सेट परीक्षेत यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.