शिक्षकाचा मुलगा बनला पोलीस उपनिरीक्षक!
जिद्द व अभ्यासाच्या जोरावर टिपूसुलतान मदारसाहेब शेखचे अतुलनीय यश !
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
जिद्द व अभ्यास असल्यावर काहीही साध्य करता येतं! तो मार्ग कितीही खडतर असो यश मिळतचं.त्याचंचं एक उदाहरण -निगडी खुर्द गावातील टिपूसुलतान मदारसाहेब शेख या शिक्षकाच्या मुलामुळे पुन्हा अधोरेखित झाले.
जिद्द व अभ्यासाच्या जोरावर जत तालुक्यातील निगडी खुर्द गावातील प्राथमिक शिक्षक मदारसाहेब शेख यांचे सुपुत्र टिपूसुलतान शेख यांची महाराष्ट्र पोलीसमध्ये पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली. टिपूसुलतान शेख यांनी या यशाचे श्रेय आई व वडील यांना दिले आहे. गगनाला गवसणी घालणारे व ग्रामीण विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे त्यांचे हे यश आहे.
टिपूसुलतान मदारसाहेब शेख हे निगडी खुर्द गावातील प्रथम अधिकारी आहेत. ग्रामस्थ,मित्र परिवार यांच्याकडून कौतुकाचा वर्षांव होत आहे.
टिपूसुलतान शेख यांचे १० वी पर्यंतचे शिक्षण प्राथमिक मराठी शाळा निगडी(खुर्द) येथे झाले. १० वीला ८६% गुण मिळवून उत्तीर्ण झाले. १२ वी शास्त्र जतमधून ७८% गुण मिळवून उत्तीर्ण झाले. आर आर कॉलेजमधून बी.एस्सी.ला ९६% गुण मिळवून उत्तीर्ण झाले. त्याचबरोबर सांगलीतील एन एस लॉ कॉलेज मधून एल.एल.बी. वकिलीचा परीक्षा उत्तीर्ण झाले.
एमपीएससी परीक्षेतून मुंबई मुख्यालय PSI पदी रुजू
टिपूसुलतान शेख हे मूळ सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील निगडी खुर्द या गावचे रहिवाशी आहेत. टिपूसुलतान यांचे वडिल जिल्हा परिषदेचे निवृत्त शिक्षक आहेत.आई गृहिणी आहे.खेडे गावात राहून मुलाला उच्च शिक्षण दिलं.मुलानेही त्यांचा विश्वास सार्थ करुन दाखवत एमपीएससी परीक्षेतून पीएसआय पदाला गवसणी घातली. MPSC च्या अंतिम निकालानंतर १५ महिन्यांचं ट्रेनिंग पूर्ण करुन ते ३० मार्च रोजी मुंबई मुख्यालयात पीएसआयपदी रुजू झाले आहेत.
सन २०१७ मध्ये पीएसआय पदाची पूर्व परीक्षा दिल्यानंतर, २० ऑक्टोबर २०१८ रोजी मुख्य परीक्षा आणि शारीरीक चाचणी दिली होती. पीएसआय परीक्षेचा निकाल ८ मार्च २०१९ रोजी लागला. त्यानंतर, ७ जानेवारी २०२० रोजी महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी, नाशिक येथे १५ महिन्यांचं ट्रेनिंग पूर्ण केले.आपलं ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर,स्पर्धा परीक्षेच्या काळात अनेक प्रकारचे अडचणींना तोंड देत आज मला ह्या पदापर्यंत पोहचण्यास मित्र परिवाराची मोलाची साथ मिळाल्याचे पीएसआय टिप्पूसुलतान शेख यांनी प्रगल्भनायकशी बोलताना दिली.

संबंधित बातम्या
भारती विद्यापीठ इंग्लिश मेडीयम स्कुल लोहेगाव पुणे येथे सीबीएसइ चे सीओइ प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात गुरूकुल विद्यालयाचे सुयश
लिंगीवरे येथील धुळाजीराव झिंबल विद्यालयाचे विज्ञान प्रदर्शनात यश