अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
जत तालुक्यातील कुणीकोणूर येथे सर्व ग्रामस्थांनी एक दिवशीय उपोषण केले.एकीकडे महाराष्ट् राज्यात कोरोनासारख्या महाभयंकर रोगाने थैमान घातले असताना आरोग्य विभागाचे दुर्लक्ष असल्याच्या कारणावरून कुणीकोणूर गावात आज सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर आटपाडकर यांच्या नेतृत्वखाली ग्रामपंचायतसमोर उपोषण करण्यात आले.
कुणीकोणूर गावात तीन दिवसापूर्वी डेंग्यूचे एकूण पंधरा रुग्ण सापडले असून काही रुग्ण सांगली येथे उपचार घेत आहेत.तर काही रुग्ण घरी उपचार घेत आहेत. गावात प्राथमिक आरोग्य उपकेंद्र असूनही येथील कर्मचारी वेळेवर उपचार अथवा रोगाविषयी जनजागृती करीत नाहीत.सर्वसामान्य जनतेला वेटीस धरत आहेत.या भागात दोन दिवसापासून डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत असून कोरोनासारख्या महाभयंकर रोगामुळे सर्वसामान्य जनतेला भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.आरोग्य विभागाने तात्काळ लक्ष देऊन कामात सुधारणा करावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे उपोषण करणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर आटपाडकर यांनी दिली. यावेळी येळवी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.दत्ता फडतरे यांनी उपोषणकर्त्याची भेट घेऊन आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी चांगले काम करतील, यासाठी आपण स्वतः लक्ष घालणार असल्याचे सांगून उपोषण सोडले. यावेळी सरपंच लक्ष्मण पाटील, ग्रामसेवक,माजी सरपंच रामचंद्र खांडेकर,अल्ताफ शेख,पत्रकार संजय कांबळे आदींसह कुणीकोणूर ग्रामस्थ व महिला या एक दिवशीय उपोषणात सहभागी झाले होते.

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर