
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:
आटपाडी पंचायत समिती येथे कोरोना नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली.त्यांचे उद्घाटन पंचायत समितीच्या सभापती सौ. पुष्पाताई जयवंत (भाऊ) सरगर व आटपाडीचे तहसीलदार सचिन मुळीक यांच्या हस्ते करण्यात आले .
हा कक्ष आपत्ती व्यवस्थापन समितीसाठी दररोज 24 तास खुला राहील .आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाचा क्रमांक 02343-221717 असा आहे. या क्रमांकावर आटपाडी तालुक्यातील नागरिकांनी कोरोना संसर्गविषयी कोणत्याही अडचणी असल्यास संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी सचिन भोसले, भाजपा नेते जयवंतराव सरगर व तालुका आरोग्य अधिकारी सौ. साधना पवार उपस्थित होते.
आटपाडी तालुक्यातील नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क साधून माहिती घ्यावी असे आवाहन नूतन सभापती सौ.पुष्पाताई जयवंत (भाऊ) सरगर यांनी केले.


संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर