माळशिरस केंद्राची एनएमएमएसची परीक्षा संपन्न

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:
इयत्ता८वी च्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा २०२०-२०२१ही माळशिरस केंद्राची परीक्षा अकलूज येथील जिजामाता कन्या प्रशाला येथे प्रशासनाने दिलेले कोरोनाचे सर्व नियम पाळून संपन्न झाली.
माळशिरस केंद्रातील माळशिरस,पिलीव,फोंडशिरस,अकलूज, खुडूस, मेडद,शिंदेवाडी,सदाशिवनगर,मोरोचि इत्यादी शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.