महेश केंगारचे जेईई परीक्षेत यश
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:
माळशिरस तालुक्यातील भांबुर्डी गावचा महेश केंगार हा विद्यार्थी!आई व वडील शेतमजूर! प्रचंड इच्छाशक्ती, जिद्द व तितकीच उत्तुंग धेयासक्ती असली की अशक्य असलेली गोस्ट शक्य करता येते,हे महेश केंगार यांनी जेईई परिक्षेत घवघवीत यश संपादन करून भांबुर्डी गावाचे नाव जिल्ह्यात करून दाखविले.त्यामुळे गणिताचा टक्का घसरलेला आहे,तो टक्का वाढला पाहिजे असे मत कोहिनूर फौंडेशन माळशिरसचे संस्थापक अमोल चोरमले यांनी बोलताना व्यक्त केले.
केंद्र सरकारकडून अभियांत्रिकी प्रवेशासाठी महत्त्वाची मानली जाणारी जीईई परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळलेबद्धल विद्यार्थी महेश केंगार व त्याचे शिक्षक अमोल चोरमले यांचा सत्कार माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी सोलापूर जिल्हा किसान मोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब सरगर, कोहिनूर फौंडेशनचे संस्थापक अमोल चोरमले ,कायदेशीर सलागार अॅड.जे. पी.कदम ,माळशिरस तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष निनाद पाटील, पत्रकार संघाचे मार्गदर्शक विनोद बाबर , माजी तालुका अध्यक्ष संजय देशमुख, कार्याध्यक्ष एल .डी.वाघमोडे, तालुका उपाध्यक्ष मनोज राऊत , तानाजी वाघमोडे , सचिव संजय हुलगे सहसचिव लक्ष्मण राऊत , प्रवक्ता बंडु पालवे,शिवम कांबळे , नितीन मगर,आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित बातम्या
भारती विद्यापीठ इंग्लिश मेडीयम स्कुल लोहेगाव पुणे येथे सीबीएसइ चे सीओइ प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात गुरूकुल विद्यालयाचे सुयश
लिंगीवरे येथील धुळाजीराव झिंबल विद्यालयाचे विज्ञान प्रदर्शनात यश