अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
राष्ट्रीय आम जन सेवा पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी टिपू सुलतान सिकंदर पटवेगार यांची निवड झाली आहे.
टिपू सुलतान पटवेगार यांनी विविध आंदोलने करून सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून दिला आहे. पटवेगार म्हणाले की,राष्ट्रीय आम जनसेवा पार्टीचा विचार वंचित घटकांना न्याय मिळवून दिला जाईल. तसेच राज्य सरकार च्या योजना तळागाळातील गोरगरीब जनतेपर्यंत पोचण्याचा माझा मानस आहे. मी पक्षाची एकनिष्ठ होऊन पुढील काळात येणाऱ्या सर्व निवडणुका पार्टी मार्फत लढविण्याचा माझा मानस आहे .त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्या कामाची दखल घेत माझ्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देत पार्टीचे काम मनापासून करणार ही अपेक्षा व्यक्त केली.


संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन