पुरोगामी संघर्ष परिषदेच्या जिल्हा अध्यक्षपदी स्वाती लांडगे

सोशल मीडियाच्या आटपाडी तालुकाध्यक्षपदी संतोष रणदिवे

मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:

पुरोगामी परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष प्रा.सुभाष वायदंडे यांच्या उपस्थितीत व पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष अमोल लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली आटपाडी येथे रेस्टहाऊसमध्ये झालेल्या बैठकीत पुरोगामी संघर्ष परिषदेच्या सांगली जिल्हा महीला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदी स्वाती लांडगे (आटपाडी) यांची निवड करण्यात आली. संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांनी त्यांना निवडीचे पत्र देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
संतोष रणदिवे यांची आटपाडी तालुका सोशल मीडिया अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी आटपाडी तालुका अध्यक्ष सागर लांडगे ,जिल्हा संपर्कप्रमुख अमर शिंदे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अक्षय खुडे, पलुस तालुका अध्यक्ष राहुल वारे,सुहास लांडगे,सुनीता लांडगे,अश्विनी ठोंबरे,शुभांगी लांडगे,आदर्श लांडगे, प्रेम नाईकनवरे,तुषार लांडगे,विलास रणदिवे,महादेव लांडगे, संतोष लांडगे,रुशी लांडगे,अवधुत लांडगे,
सुशांत लांडगे, यश नाईकनवरे, वैभव लांडगे, विशाल लांडगे, आशितोष लांडगे,समिर लांडगे, वैभव सरतापे,सूर्यकांत खरात,अजित खिलारे(सोलापूर),संदेश कांबळे, छोट्या लांडगे व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. राज्य कार्यकारणी सदस्य रविंद्र(बापू) लांडगे यांनी आभार मानले.