महिलांच्या हाती,गोरडवाडी ग्रामपंचायतीची नाडी!

सरपंचपदी बायडाबाई गोरड तर उपसरपंच मैनाबाई गोरड बिनविरोध

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:

माळशिरस तालुक्यातील गोरडवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी बायडाबाई पांडुरंग गोरड यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली,तर उपसरपंच पदासाठीही एकमेव अर्ज आल्याने मैनाबाई दीपक गोरड यांची निवड करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अध्यासी अधिकारी मोहन नागणे यांनी दिली.
सहाय्यक म्हणून ग्रामसेवक रवींद्र पवार यांनी काम पाहिले.
गोरडवाडी ग्रामपंचायत कार्यालयात 23 फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते १२या वेळेत अर्ज भरणे, १२ ते १ या वेळेत नामनिर्देशन अर्जाची छाननी तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ १ ते २ आणि सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूकीची वेळ दुपारी २ वाजता निवडणूक प्रक्रिया पार पडली. पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्थ ठेवला होता.
गोरडवाडी ग्रामपंचायतीचे ११ सदस्य
वार्ड क्र.१ बायडाबाई पांडुरंग गोरड , मेघाराणी संदीपान कर्णवर
वार्ड क्र .२ विष्णू नाना गोरड , मैनाबाई दिपक गोरड , जयश्री माणिक कोकरे
वार्ड . क्र .३ विजय निवृत्ती गोरड , ताई शंकर यमगर , ज्योती नवनाथ केंगार ,
वार्ड . क्र ४ पांडुरंग किसन पिसे , पुनम मच्छिद्र गोरड , मुगाबाई आज्ञान गोरड
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कर्णवर , माजी सरपंच नानासाहेब कर्णवर , माजी सरपंच भिकाजी गोरड , माजी सरपंच लक्ष्मण गोरड , माजी सरपंच नानासाहेब हुलगे , पोलीस कर्मचारी वैभव लेंडवे , राहुल रुपनवर , पोलीस पाटील नानासाहेब यमगर , हनुमंत गोरड , मल्हारी हुलगे , माजी सरपंच रामचंद्र गोरड , माजी सरपंच भागवत कर्णवर , राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभा तालुका अध्यक्ष मच्छिंद्र गोरड ,अजिनाथ कर्णवर , बापू गोरड , प्रवक्ते प्रा . शरद कर्णवर , चेअरमन खंडु कळसुले , तायाप्पा हुलगे , सचिन कर्णवर , आबा गोरड , जयवंत गोरड , अमोल कर्णवर , गणेश कोकरे , सचिन हुलगे , ब्रम्हदेव हुलगे , माजी चेरमन संतोष गोरड , संजय कोळेकर , संजय सरगर ,राहुल पिसे , नवनाथ सुर्यवशी , लक्ष्मण कर्णवर , बापू कोकरे , आप्पा गोरड , भारत गोरड , किसन कर्णवर सह आदी मान्यवर उपस्थित होते.