
नंदकुमार विभुते
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:
आटपाडी येथील श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयातील प्राध्यापक संदीप विभुते यांना नुकतीच शिवाजी विद्यापीठाची पीएचडी पदवी प्राप्त झाली.
संदीप विभुते हे माडगूळे गावचे रहिवासी असून ते गेली आठ वर्षे श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयात नोकरी करतात. त्यांनी सिंथेसिस अँड कॅरेक्टराझेशन ऑफ ट्रांझीशन मेटल कॅम्पलेक्सेस अँड देयर एप्लिकेशन्स ,या विषयावर शोध प्रबंध सादर केले होते.यावर त्यांना शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी. ही पदवी विद्यापीठाने प्रदान केली.
पीएच.डी.संशोधन प्रबंधासाठी प्राचार्य डॉ.आर .व्ही शेजवळ, लालबहादूर शास्त्री महाविद्यालय सातारा व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर रसायनशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. डी. एम पोरे ,दि आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन अमरसिंहबापू देशमुख,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .विजय लोंढे ,प्रा.शैलेश विभुते यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
प्रा.संदीप विभुते यांना पीएचडी पदवी प्राप्त झाल्याबद्दल आटपाडी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.सुभाष कारंडे,सहसचिव एच.यु.पवार, निरीक्षक अशोक चौगुले यांनी त्यांचे महाविद्यालयात अभिनंदन केले.

संबंधित बातम्या
भारती विद्यापीठ इंग्लिश मेडीयम स्कुल लोहेगाव पुणे येथे सीबीएसइ चे सीओइ प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात गुरूकुल विद्यालयाचे सुयश
लिंगीवरे येथील धुळाजीराव झिंबल विद्यालयाचे विज्ञान प्रदर्शनात यश