जत येथील के.एम. हायस्कूल परीक्षा केंद्राची पाहणी

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

कोव्हिड 19 अंतर्गत जत येथील के.एम. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे शिक्षण विस्तार अधिकारी टी.एल. गवारी यांनी भेट देऊन पाहणी केली. शाळेत शासनाच्या निर्देशानुसार सामाजिक अंतर व मास्क व सनिटायझर वापरत असल्याने समाधान व्यक्त केले.
१० वी व १२ वी परीक्षा संदर्भात जत शहरातील केंद्राची पाहणी करण्याचे आदेश होते. त्यानुसार ही पाहणी करण्यात आली. यावेळी विषयतज्ञ सुरेंद्र सरनाईक, प्राचार्य रियाज सय्यद उपस्थित होते. पथकामार्फत शाळा वर्गाची पाहणी केली. शाळेमार्फत विद्यार्थी बैठक व्यवस्था, विद्यार्थी नोंद, सॅनिटाईझर, टेम्परेंचर गण, ऑक्सीमीटर, इत्यादी कोरोना-19 नियमांचे पालन केलेचे दिसून आले. त्यामुळे शिक्षण विस्तार आधिकारी यांनी समाधान व्यक्त केले.