संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /माळशिरस:
श्रीनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेज,माळशिरस या विद्यालयात प्रजासत्ताक दिनाचा ७१ वा वर्धापन दिन दिमाखात साजरा करण्यात आला.ध्वजारोहन सचिन वावरे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी विद्यालयात पताका, फुगे, सजावट तसेच विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, ध्वजगीत, संविधान उद्देशिका म्हणून साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना बिस्किट पुडे व चॉकलेट वाटण्यात आले.यावेळी आलेले सर्व मान्यवर, प्रमुख पाहुणे, पालक यांचे विद्यालयाच्या वतीने गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
संस्थाध्यक्ष आप्पासाहेब देशमुख, गणपतराव वाघमोडे, बाळासाहेब सरगर, महादेव माने, गौरव गांधी, महेश बोत्रे, निलेश घाडगे, धनाजी देवकर, रावसाहेब देशमुख, दिग्विजय झेंडे, बिरुदेव गोरे, प्राचार्य योगेश गुजरे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व बहुसंख्य पालकवर्ग उपस्थित होता.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिन बोरावके यांनी केले.तर आभार योगेश गुजरे यांनी मानले.


संबंधित बातम्या
भारती विद्यापीठ इंग्लिश मेडीयम स्कुल लोहेगाव पुणे येथे सीबीएसइ चे सीओइ प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात गुरूकुल विद्यालयाचे सुयश
लिंगीवरे येथील धुळाजीराव झिंबल विद्यालयाचे विज्ञान प्रदर्शनात यश