प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /करगणी:
करगणी येथे भारतीय जनता पार्टी आणि उमेश पाटील युवाशक्तीने एकत्र येत अनिल बाबर विकास सोसायटीत जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी शिवसेनेविरोधात ठराव घेऊन मागचे पुढचे सगळे हिशोब चुकते केले, असे मत युवानेते उमेश पाटील यांनी व्यक्त केले.ठरावानंतर ते बोलत होते.
पाटील पुढे म्हणाले ,अनिल बाबर सोसायटी बिनविरोध करताना उमेश पाटील गटाने मोठे मन दाखवत कमी जागा घेतल्या होत्या.परंतु ठरावावेळी मतदानाचा घाट शिवसेनेने घातला.
शिवसेनेने आपली सगळी ताकद पणास लावली. तालुकास्तरावरून सूत्रे फिरविण्यात आली,पण त्यामध्ये त्यांना अपयश आले.
सर्वसमावेशक अनिल उर्फ मामा पिंजारी यांच्या नावाचा ठराव घेत शिवसेनेला मोठी धोबीपछाड देण्यात आली.
भाजपकडून ठरावासाठी अशोक पिंजारी,पिंटू सरगर, सुनील पुकळे, भगवान सरगर, भारत पाटील यांनी मेहनत घेतली तर उमेश पाटील युवाशक्ती कडून ग्रा.पं. सदस्य मुद्दसर इनामदार, करगणीचे नेते उत्तम माने, महेश पाटील,भारत पाटील, विष्णू खिलारी, सचिन कोळेकर, विरोधी पक्ष नेते श्रीधर खिलारी, मनोहर माने, समाधान करांडे, इजाज इनामदार, दुर्वा पाटील, चिकू पांढरे यांनी तर वाडा गटाकडून बाळासाहेब करांडे, रघुनाथ चोथे, एल.के.खिलारी तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सत्यवान पिंजारी, प्रकाश गायकवाड आणि दाजी खिलारी यांनी शर्थीचे प्रयत्न केले.
ठरावानंतर झालेल्या सयुंक्त बैठकीत करगणी ग्रा.पं. मध्येही लवकरच सत्तांतर करण्याचे निश्चित झाले.
करगणी येथे मोठा जल्लोष करण्यात आला.

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन